Chinchwad News : पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर आढळली बेवारस बॅग

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर एक बेवारस बॅग आढळली. यामुळे काही वेळ परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले. मात्र काही वेळाने बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही बॅग उघडली असता त्यात कपडे आढळून आले. ही घटना आज शनिवारी (दि. 30) सकाळी घडली.

_MPC_DIR_MPU_II

जुना पुणे मुंबई महामार्गावर चिंचवड येथे पोलीस उपायुक्तांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर महामार्गावर शनिवारी सकाळी एक बेवारस ट्रॅव्हल बॅग आढळली. पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही बॅग उघडल्यानंतर त्यात कपडे आढळून आले. दरम्यान परिसरात बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.

पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले, “सकाळी एक बेवारस बॅग आढळली होती. त्याबाबत बीडीएसला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी बॅग उघडली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. महामार्गावर अनेक ट्रॅव्हल्स बस थांबतात. त्यातील एखाद्या प्रवाशाची ही बॅग असण्याची शक्यता आहे. पोलीस याबाबत तपास करीत आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.