Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वाहन चालक दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वाहन चालक दिन (Chinchwad) सोमवारी (दि. 18) साजरा करण्यात आला. यामध्ये मोटर परिवहन विभागातील वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत असलेल्या वाहन चालकांना सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त भास्कर डेरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. पोलीस चालक अंमलदार यांनी शासकीय गाडी चालवत असताना अपघात टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन केले.

Pune : तीन दिवसात सायकलवर 580 किलोमीटर अंतर पूर्ण करून सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. वाहन चालक पोलीस अंमलदारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी सर्व पोलीस अंमलदार आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन पोलीस निरीक्षक मोटर परिवहन विभाग मंगेश पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.