Chinchwad: वाहन चोरून विक्री करणारा अट्टल वाहन चोर पोलिसांच्या जाळ्यात

Chinchwad: vehicle thief caught selling vehicle by pimpri-chinchwad police crime branch unit 5 गोविंदस्वामी सेल्वराज चेन्नी (वय.36 रा. साबळेबंधू बिल्डिंग, विश्रांतवाडी जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

एमपीसी न्यूज- वाहन चोरून त्याची विक्री करणाऱ्या अट्टल वाहन चोराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तीन दुचाकी व एक ऑटो रिक्षा असा एकूण 1,40,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोविंदस्वामी सेल्वराज चेन्नी (वय.36 रा. साबळेबंधू बिल्डिंग, विश्रांतवाडी जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे व त्यांचे पथक पेट्रोलिग करीत असताना श्यामसुंदर गुट्टे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पिंपरी-चिंचवड शहराच्या रेकॉर्डवरील अट्टल वाहनचोर गोविंदस्वामी चेन्नी किवळे येथील मुकाई चौकात बीआरटी बस स्टॉपजवळ चोरीचे वाहन घेऊन विकण्याकरिता येणार आहे. पोलिसांनी तात्काळ ऍक्शन टीम तयार केली व आरोपीस ताब्यात घेण्याकरता ते रवाना झाले.

आरोपी चेन्नी हा काळया रंगाची दुचाकी घेऊन चौकात आला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीसह पळून जाताना त्याला पकडण्यात आले. आरोपी चेन्नीची विचारपूस केली असता त्याने चोरी केलेल्या वाहनांची कबुली दिली असून त्याच्याकडून तीन दुचाकी व एक ऑटो रिक्षा असा एकूण 1,40,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासकामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी श्यामसुदंर गुट्टे, फारुक मुल्ला, नितिन बहिरट, राजकुमार इघारे, भरत माने, धनंजय भोसले, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, दयानंद खेडकर, गोपाळ ब्राम्हंदे, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, गणेश मालुसरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.