Chinchwad : विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकी (Chinchwad) दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अधिकची खबरदारी घेतली आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. त्याचबरोबर अन्य विविध प्रकारची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. गणेशोत्सव दरम्यान 1313 सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान चोरी, पाकीटमारी होऊ नये, यासाठी गुन्हे शाखेकडून पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.

शहरातील विविध मिरवणूक मार्गाची घातपात विरोधी तपासणी करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांचे नॉईज लेवल मीटरद्वारे रीडिंग घेण्यासाठी देखील स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

विसर्जन मिरवणुकी दरम्यान अनेक गणेशोत्सव मंडळे आपले वर्चस्व दाखवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. मात्र यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांनी यावर्षी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये अनुचित प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली 21 नवीन वाहने

शहरात विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही कायदा (Chinchwad) व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शहर पोलीस दलाकडून गणेशोत्सव दरम्यान संवेदनशील भागामध्ये तसेच मिश्र वस्तीमध्ये पथसंंचलन करण्यात आले. विसर्जन मार्गावर व प्रत्येक विसर्जनाची ठिकाणी सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आली आहेत.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या विसर्जन स्थळांसह 89 नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त दहा कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रमुख विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनीक्षेपक यंत्रणेसह तात्पुरते नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकांचे आयोजन –

ईद-ए-मिलाद या सणानिमित्त शनिवारी (दि. 30) पिंपरी चिंचवड शहरात मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.