BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या शहर सरचिटणीसपदी विनोद मालू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे सरचिटणीस म्हणून चिंचवडच्या प्रेमलोक पार्क भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते विनोद मालू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनुसार अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष सलीम शिकिलकर यांनी मालू यांना नियुक्तीपत्र दिले. त्यावेळी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर, शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते.

मालू हे 1989 ते 1998 या काळात मावळ तालुक्यातील पवनानगरचे (काले कॉलनी) सरपंच होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख आहे. आमदार जगताप यांच्याबरोबर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ओम साई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मालू विविध सामाजिक उपक्रम राबवतात.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like