Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने नगर जिल्ह्यातील चारा छावणीला भेट

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंंचवड शहराच्या वतीने अहमदनगर जिल्हा कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील चारा छावणीला 5 टन चारा आणि 2000 लिटरची पाण्याची टाकी भेट दिली. मागील 15 दिवसांत नगर, सुपा, माढा, करमाळा, कर्जत या तालुक्यातील चारा छावणींचा अभ्सास केला होता. प्रत्यक्ष छावणीला भेटी दिल्या होत्या.

यामध्ये चिलवडी येथील छावणीत जवळकर 900  विविध प्रकारची जनावरे आहेत. त्यांची गरज ओळखून त्यांना मदत करण्याचे ठरविले. फेसबुक आणि व्हाटसअपच्या माध्यमातून देणगी जमाकरुन हे साहित्त्य भेट दिले.

  • यासाठी छावणीचे प्रमुख राहुल सरकाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी मदत केली. चा-यासाठी रमेश सरदेसाई आनंद पाथरे आनंद पुजारी,रंजना गोराणे यांनी मदत केली. याचे संयोजन डॉ मोहन गायकवाड भरत शिंदे , सायली सुर्वे, रुपाली कड, मिलन गायकवाड, अनिल शिंदे, कोर्टी आणि त्यांचे सहकारी यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.