Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानतर्फे मतदार जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आणि नूतन विद्या मंदिर कृष्णानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.

अतिरिक्त व ब प्रभाग आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तानाजी सावंत उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन कर्तव्यात करु नका कसूर मतदान करुन लोकशाहीचा दूर करा अडसर, डरने की क्या बात है पुलीस प्रशासन साथ है, अच्छा मतदाता का हौसला एक मत से हो फैसला, अशा घोषणा देऊन जनजागृती केली.

या अभियानाचे संयोजन डॉ मोहन गायकवाड, नूतन विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका नूतन सवाने यांनी केले. या अभियानात अनघा दीक्षित , अभिजित लोंढे, तृषाल जाधव, रेखा जाधव, शिवाजी पाटील आणि पालक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.