Chinchwad : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या स्वच्छ पवनामाई अभियानात ज्युनिअर मकरंद अनासपुरे सहभागी

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात झाली आहे. दुस-या पर्वातील अभियानाच्या पाचव्या आठवड्यात केजुबाई बंधारा येथे असंख्य पर्यावरण प्रेमींनी आणि संस्थानी सहभाग घेऊन नदीपात्रातून जलपर्णी बाहेर काढली. ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांचा सहभाग हे या अभियानाचे आकर्षण ठरले.

अभियानात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रो प्रदीप वाल्हेकर, रो सुभाष वाल्हेकर, रो शेखर चिंचवडे, रो सुधीर मरगळ, रो गणेश बोरा, रो जगन्नाथ फडतरे, रो मारुती उत्तेकर, रो सुनील कवडे, रो सोमनाथ हरपुडे, थेरगाव सोशल फोउंडेशनचे अनिकेत प्रभू, भावसार व्हिजन इंडियाचे राजीव भावसार, लक्ष्मीकांत भावसार, राजेश कुलकर्णी, जलदिंडीचे गणेश जवळकर, जे एस पी एम कॉलेजचे प्राचार्य प्रशांत हंबर, पिंपरी चिंचवड बार अससोसिएशनचे हर्षद नढे, रावेत सिटीझन फोरमचे विशाल भोंडवे, जेष्ठ नागरिक संघाचे सूर्यकांत मुथियान, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमचे ओंकार कुलकर्णी, एस पी वायर्सचे कामगार, रानजाई फोउंडेशन देहूचे सोमनाथ मुसुडगे, देश का सच्चा हिरो चंद्रकांत कुलकर्णी, पर्यावरण प्रेमी सिकंदर घोडके आदींनी सहभाग घेतला.

रविवारी पवना नदीतून तीन ट्रक जलपर्णी काढण्यात आली. तर आजवर पवना नदीपात्रातून पाच ट्रक जलपर्णी आणि दोन ट्रक भरून गोधड्या व जुने कपडे काढण्यात आले. ज्युनियर मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित सर्व पर्यावरणप्रेमींना आपल्या विनोदी शैलीतून नदीचे प्रदूषण आणि आपली जबाबदारी याविषयी मार्गदशन केले. रविवारी (दि. 4) केजुबाई बंधारा येथे पवना नदी स्वच्छता अभियान होणार आहे. शहरातील नागरिकांनी या अभियानात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.