Walhekarwadi: संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या शिबिरात 163 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वाल्हेकरवाडी शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १६३ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.

रक्त संकलनाचे कार्य वायसीएम रक्तपेढी आणि संत निरंकारी मंडळ रक्तपेढी (विलेपार्ले) यांनी केले. शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे केंद्रीय प्रचारक नेपालसिंग चौधरी (दिल्ली) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी विभागाचे संयोजक गिरीधारी मतनानी, वाल्हेकरवाडी शाखाप्रमुख रामचंद्र लाड, क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी (पिंपरी), पोपट तावरे (पुणे) संचालक ज्ञानेश्वर पिठे (पिंपरी), व्यवस्थापक चंद्रकांत चव्हाण (थेरगाव) आणि सेवादल, फाऊंडेशनचे स्वयंसेवक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरासाठी नगरसेविका करुणाताई चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाल्हेकर, श्रीधर वाल्हेकर, माजी सत्तारूढ पक्षनेते श्यामराव वाल्हेकर इत्यादी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.

या शिबिराची सुरूवात सकाळी सात वाजता जनजागृती पदयात्रेने करण्यात आली. या पदयात्रेची सुरूवात पीसीएमसी शाळा येथून करण्यात आली. चिंतामणी चौक, सायली कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, महानगरपालिका दवाखाना, लक्ष्मी नगर इत्यादी ठिकाणी जाऊन जनजागृती करण्यात आली.

संत निरंकारी मंडळामध्ये १९८६ पासून रक्तदानाची सुरूवात झाली. आता पर्यंत १० लाखांहून जास्त बाटल्या/ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहे, अशी माहिती फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली.

रक्दानासाठी सर्वस्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्व रक्तदाते, सेवादल, स्वयंसेवक सहकारी यांच्या योगदानाबद्दल रामचंद्र लाड यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन सुशांत चाळके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.