BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad: जलवाहिनी फुटली; भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – बिजलीनगर रस्त्यावरील चिंचवड मुख्य गुरुत्व जलवाहिनी आज (बुधवारी) दुपारी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी सांगवी तसेच चिंचवड गुरूत्ववाहिनी  काही काळासाठी  बंद केल्या असल्याने चिंचवडभागातील आज सायंकाळचा  पाणी पुरवठा उशिरा  होणार  आहे.

बिजलीनगर  रस्त्यावर चिंचवड मुख्य गुरुत्व जलवाहिनी आज दुपारी  फुटली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी सांगवी तसेच चिंचवड गुरूत्ववाहिनी  काही काळासाठी  बंद कराव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर दापोडी, सांगवी, पिंपळेगुरव,  सुदर्शननगर या भागांमधील आज सायंकाळचा पाणीपुरवठा उशिरा  होणार  आहे.

गळतीची दुरुस्ती करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. गळतीची दुरुस्ती लवकरात लवकर करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी  उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.