Chinchwad: पाईपलाईन फुटल्याने चिंचवडगावातील पाणीपुरवठा विस्कळीत

Chinchwad: Water supply in Chinchwad gaon is disrupted due to pipeline rupture चिंचवड गावातील चापेकर चौक ते अहिंसा चौक या दरम्यानच्या बोअरवेल खोदत असताना प्रशासनाच्या गलथानपणामुळे पाण्याच्या पाईपलाईनवर बोअरवेल खोदण्यात आले.

0

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले. याचाच परिणाम चिंचवडगावातील पाणी पुरवठ्यावर देखील झाला आहे. शनिवारी (दि.1) पाईपलाईन फुटली असून रविवारी (दि.2) पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी बोअरवेल घेण्याचे काम शनिवारी सुरू होते. चिंचवड गावातील चापेकर चौक ते अहिंसा चौक या दरम्यानच्या बोअरवेल खोदत असताना प्रशासनाच्या गलथानपणामुळे पाण्याच्या पाईपलाईनवर बोअरवेल खोदण्यात आले.

यामुळे पाईपलाईन फुटली आणि पाणी वाहू लागले. पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. चापेकर चौकात देखील पाणी साचले.

पाईपलाईन फुटल्याचे लक्षात येताच महापालिका प्रशासनाने पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. रविवारी सकाळी चिंचवडगाव परिसरात पाणीपुरवठा केला जातो. शनिवारी पाईपलाईन फुटल्याने रविवारचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

बोअरवेल खोदताना ज्या ठिकाणी बोअरवेल खोदले जाणार आहे, तिथे अंडरग्राउंड काही काम केले आहे का? गॅस पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन, इलेक्ट्रिक लाईन, भूमिगत गटारी गेल्याचे तपासणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या गलथानपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like