Chinchwad : शहरात उद्या रंगणार दृष्टिहीन मुलींचा क्रिकेट सामना

एमपीसी न्यूज-  सध्या सर्वत्र क्रिकेटचा फिवर सुरू आहे. भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज होत आहे. या निमिताने प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड व जितो चिंचवड-पिंपरी यांच्या वतीने भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी व मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस अर्थात हा प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी दृष्टिहीन मुलींच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन शहरात केले आहे.
पिंपरीतील आण्णासाहेब मगर स्टेडियमवर उद्या मंगळवारी (दि.२३) सायंकाळी पाच वाजता दृष्टीहीन मुली व डोळस मुलींमध्ये हा सामना रंगणार आहे. शहरात प्रथमच अशा सामन्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रेरणा परिवाराचे सेक्रेटरी सतीश नवले यांनी सांगितले आहे. या सामन्यासाठी मुंबई, पुणे येथील दृष्टिहीन खेळाडू सहभागी होणार आहेत.

  • प्रेरणा संस्थेच्या वतीने २४ एप्रिल हा दिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो.या निमित्त हा विशेष सामाना होणार आहे.याच बरोबर भारतीय संघाने विश्वचषकाच्या सामन्यात उत्तम कामगिरी करावी व यंदाचा विश्वचषक भारतात घेऊन यावा यासाठी शुभेच्छा देण्यात येणार आहे.
दृष्टीहीन व्यक्तींच्या व्यथा, वेदना व गरज यांची जाणीव व्हावी यासाठी या विशेष सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.