Chinchwad Weapon Crime : शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी चिंचवड (Chinchwad Weapon Crime) पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोयता जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 20 मे) रात्री दहा वाजता चिंचवड मधील आनंदनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.

ऋषिकेश उर्फ सोन्या नवनाथ सलगर (वय 22, रा. विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड), बंटी उर्फ किरण खरात (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ऋषिकेश याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड (Chinchwad Weapon Crime) येथे शुक्रवारी रात्री स्वतःजवळ कोयता बाळगला. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून ऋषिकेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.