Chinchwad : महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ; तपासाची टक्केवारीही कमीच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात बलात्कार, विनयभंग यांसारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद यावर्षी झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस ठाण्यांमध्ये 151 बलात्कार तर 397 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. हा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत बराच मोठा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे आकडे सांगत आहेत.

एक जानेवारी ते 31 नोव्हेंबर 2019 या कालावधीत बलात्कार, विनयभंग, जबरी चोरी, घरफोडी, विश्वासघात, फसवणूक, अपघाती मृत्यू या गुन्ह्यांचा आकडा वाढला आहे. तर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. यावर्षी बलात्कार आणि विनयभंगाचे एकूण 548 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 541 गुन्हे उघडकीस आले आहेत. हेच प्रमाण मागील वर्षी 430 (दाखल) आणि 417 (उघड) असे होते. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असली तरी त्याची उकल देखील तेवढ्याच प्रमाणात झाली आहे.

वर्षभरात चोरीच्या घटनांनी पोलिसांना चांगलेच हैराण केले आहे. एटीएम चोरीच्या गुन्ह्यांनी तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एटीएम चोरीच्या 13 घटना घडल्या असून त्यातील मोजक्याच घटना उघडकीस आल्या आहेत. संपूर्ण एटीएम पळवून नेण्याच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या हाती अजूनही काही लागलेले नाही. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष पथक देखील नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

जबरी चोरीचे 333 गुन्हे दाखल आहेत. त्यातील केवळ 202 गुन्हे उघडकीस आले आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास अतिशय अल्प झाला आहे. मागील अकरा महिन्यात दिवसा 51 घरफोडीच्या घटना घडल्या. त्यात केवळ 11 उघडकीस आल्या आहेत. तर रात्रीच्या वेळी 294 घटना घडल्या असून केवळ 86 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. 2 हजार 21 वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील केवळ 369 गुन्हे उघड झाले आहेत.

मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 12 हजार 573 गुन्हे दाखल झाले. त्यातील 10 हजार 31 गुन्हे उघड झाले. तर यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 9 हजार 362 गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यातील 7 हजार 24 गुन्हे उघड झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण पाच टक्क्यांनी कमी झाले आहे.

दाखल गुन्ह्यांची आकडेवाडी –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.