Chinchwad : किरकोळ कारणावरून महिलेकडून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – रिकाम्या खोलीत धंदा करायचा आहे म्हणून (Chinchwad) एका महिलेने दुसऱ्या महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.21) चिंचवड येथील विजयनगर झोपडपट्टी येथे घडली. 

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरीकांसाठी कार्यशाळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराजवळील दोन रिकाम्या खोल्यांमध्ये धंदा करायचा आहे म्हणून फिर्यादीच्या घरासमोर येवून शिवीगाळ केली तसेच धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्याशी झटापट केली ज्यामध्ये फिर्यादी यांचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र तुटून नुकसान झाले. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.