Chinchwad : पवना नदीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज – पवना नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चिंचवडजवळील थेरगाव घाट येथे उघडकीस आली. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदी पात्रात चिंचवड जवळील थेरगाव घाट येथे एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांकडून अग्निशामक दलास पाचारण करून महिलेचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आला.

मृतदेह आढळलेल्या महिलेचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष आहे. तिने अंगात हिरव्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज असा वेष परिधान केला आहे.

मृत महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.