Chinchwad : वुमेन डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे सोमवारी ‘महिला उद्योजकता विकास’ शिबिर

एमपीसी न्यूज – पुण्यातील वुमेन डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे पिंपरी-चिंचवड शहर, परिसर आणि ग्रामीण भागातील युवती आणि महिलांसाठी, येत्या सोमवारी (दि. 17) रोजी चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात दुपारी तीन वाजता ‘महिला उद्योजकता विकास’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या उद्योजकता विकास शिबिरामध्ये प्रशिक्षणापासून तर सरकारचे नवीन औद्योगिक धोरण, महिलांविषयी उद्योग धोरण, सरकारच्या विविध योजना, अन्न व औषध विभाग, मुद्रा लोन ,पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, उद्योग आधार नोंदणी, शॉप अॅक्ट परवाना याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर सर्वांसाठी विनामूल्य खुले असून या शिबिरात उद्योग स्थापन करणा-या इच्छुक युवती व महिलांसाठी उद्योग आधार नोंदणी विनामूल्य करून देण्यात येणार आहे.

महिला उद्योजकता विकास शिबिरात जास्तीत-जास्त युवती व महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महिला विकास फाउंडेशनचे संचालिका माजी नगरसेविका सुलभा उबाळे, संस्थेच्या संचालिका अपर्णा देशपांडे, पियुषा पवार, श्रद्धा मोरे, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर कुवर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.