Chinchwad: अन्नधान्य मिळत नसल्याने आनंदनगर झोपडपट्टीतील महिला उतरल्या रस्त्यावर !

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने परिसर सील केला आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना अन्नधान्य, जेवण मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने आज (बुधवारी) रस्त्यावर उतरल्या होत्या.

यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची मोठी भिती निर्माण झाली आहे. चिंचवड पोलिसांनी महापालिकेतर्फे जेवणाची सोय केली जाईल असे सांगत गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला.

चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या ठिकाणी रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. यामुळे हा परिसर सील केला आहे.

परंतु, सगळेच बंद असल्याने झोपडपट्टीतील महिलांना अन्नधान्य मिळेना, उपाशी रहावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती निर्माण झाली आहे.

त्यानंतर चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आनंदनगरमधील सगळी किराणा, रेशनची दुकान चालू राहतील. सर्वांची जेवणाची व्यवस्था केली जाईल. महापालिकेकडून घरपोच जेवन दिले जाणार आहे. . बाकी सगळ्यांनी घरी निघून जावे. केवळ पाच महिला थांबा अशी विनंती पोलिसांनी केली. त्यानंतर गर्दी कमी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.