Chinchwad: शेल्टर असोसिएट्स,संस्थेच्या वतीने जागतिक शौचालय दिन साजरा

एमपीसी न्यूज – अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची (Chinchwad)जाणीव करुन देऊन आणि स्वच्छतेसाठी समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने शेल्टर असोसिएट्स आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शौचालय दि.1डिसेंबर रोजी विद्या नगर,चिंचवड येथे साजरा करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे म्हणून (Chinchwad)सामाजिक कार्यकर्तेसय्यद पटेल,विठ्ठल कळसे,नारायण गायकवाड,गंगाधर काळे, वस्तीतील ज्योति शेंडगे, शीला शिंदे व शेल्टर असोसिएट्सच्या प्रतिनिधी सुनिता गुरव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास शेल्टर असोसिएट्सचे प्रतिनिधीरोहित कालपांडे,अवंतिका पाटील, प्रदीप वाजे,बिरुदेव चांगीरे,गौरी कुलकर्णी,संजय मोरे, सुबोधिनी कांबळे, जाहिदा खान,यांच्यासह वस्तीतील स्वयंसेवक उपस्थित होते.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस शाळांमध्ये जाऊन मुलांना देताहेत ‘कायद्याचे ज्ञान अन संस्कार’

शहरी गरीबांसाठी स्वच्छता व गृहनिर्माण क्षेत्रात सक्रियपणे काम करीत असलेल्यापुणे येथील स्वयंसेवी संस्था,शेल्टर असोसिएट्सने आपल्या ‘एक घर एक शौचालय’ उपक्रमातून महाराष्ट्रातील 7 शहरांमधील वस्त्यामध्ये 27 हजार पेक्षा जास्त वैयक्तिक शौचालयाची सोय केली आहे.जागतिक शौचालय दिनाचा कार्यक्रम हनुमान मंदिर, विद्या नगर, चिंचवड येथे विविध स्पर्धा आणि सत्कारांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात वर्ल्ड टॉयलेट डे- Accelerating Changeया पोस्टरचे अनावरण व शेल्टर संस्थेचे ‘स्वयंरचित शौचालय गीत’ गाऊन झालीत्यानंतर शेल्टर असोसिएट्सच्या सुनीता गुरव यांनी जागतिक शौचालयाच्या दिवसाचा इतिहास आणि वैयक्तिक शौचालयाचे महत्व नमूद केले. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांनी वस्तीत पूर्वीची परिस्थिती आणि शेल्टर संस्थेच्या ‘एक घर एक शौचालय’प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याने महिलांकडून कामाचे कौतुक होत असल्याचे सांगतविशेष अभिनंदन केले. प्रकल्पाच्या एक लाभार्थी प्रमिला ताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना घरात शौचालय बांधण्याचे आवाहन केले.

स्वच्छता योद्धा म्हणून “शाहीन पटेल”ह्यांचा वस्तीतील सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवण्याच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.आजच्या कार्यक्रमात लिंबू चमचा, संगीत खुर्ची आणि दागिने ओळखणेस्पर्धा सुद्धा घेण्यात आली व त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या प्रकल्प संचालिका स्मिता काळे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.