Chinchwad : चिंचवडगावात शनिवारी योगेश सोमण यांचे व्याख्यान

एमपीसी न्यूज – हिंदू स्वाभिमान दिवसनिमित्त पिंपरी-चिंचवड मधील हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध सिने कलाकार व व्याख्याते योगेश सोमण यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम उद्या शनिवारी (दि. 11) संध्याकाळी साडेसहा वाजता चिंचवडगाव चापेकर चौक, हुतात्मा चापेकर स्मारक वाचनालय हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे,

या कार्यक्रमात योगेश सोमण यांना हिंदू कुलभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 1971 च्या भारत पाक युध्दात हुतात्मा झालेले तुळशीराम साळुंके यांच्या वीरपत्नी श्रीमती मंगलताई तुळशीराम साळुंके यांना वीरपत्नी पुरस्कार; महाराष्ट्र आर्य वीर दलाचे अधिष्ठाता व्यंकटेश हालिंगे यांना स्व. प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती पुरस्कार व समाजसेवा पुरस्कार आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजंमगुंडे यांना स्व. संजय आर्य स्मृती युवा जागृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.