Chinchwad : मोबाईलचा पॅटर्न लॉक सांगण्यास नकार दिल्याने तरुणीला मारहाण

एमपीसी न्यूज – मोबाईल पॅटर्न लॉक सांगितला नाही म्हणून 19 वर्षीय तरुणीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) रोजी सकाळी दहा वाजता चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाजवळ घडली.

या प्रकरणी 19 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संभाजी गुलाब शेलार (वय 30, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित तरुणीला जबरदस्तीने त्याच्या गाडीत बसविले. तिला तिच्या मोबाईलचा पॅटर्न लॉक विचारला. तो न दिल्याने त्याने कमरेच्या पट्ट्याने तिच्या तोंडावर, हातावर मारुन जखमी केले. यावरून तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.