Chinchwad : विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी पुन्हा तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीने आपल्यावरील गुन्हा मागे घ्यावा, यासाठी तरुणीचे अपहरण करीत तिचा पुन्हा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 24) सकाळी चिंचवड येथे घडली.

स्वप्नील प्रकाश कांबळे (रा. थरमॅक्‍स चौक, निगडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 25) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास पिडित तरुणी रस्त्याने पायी चालली होती. त्यावेळी आरोपी मोटारीतून तिथे आला. आपल्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी तरुणीला अडवून जबरदस्तीने मोटारीत बसविले. त्यानंतर आरोपीने आपल्या थरमॅक्‍स चौकातील घरी पिडित तरुणीला नेले. तिथे तिचा विनयभंग केला. तसेच आपल्यावर यापूर्वी केलेले विनयभंगाचा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी शिवीगाळ व मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.