Chinchwad : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण; सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथे 12 मार्च रोजी घडली.

महेश बालघरे, आकाश बालघरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), विशाल युवराज गिरी (वय 22), प्रकाश दशरथ गिरे (वय 22), कुंदन ऊर्फ चिच्या संपत बालघरे (वय 22, तिघेही रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली) व त्यांचे इतर अनोळखी साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी स्तवन दीपक साठे (वय 25, रा. समता कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) यांनी मंगळवारी (दि. 17) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश बालघरे याच्याशी फिर्यादी साठे यांची गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी महेश बालघरे याने फोन करून ‘तुला बघून घेतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर 12 मार्च रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी साठे हे आपल्या मित्रांसह रिक्षातून चालले होते. ते ऑटो क्‍लस्टर येथे आले असता आरोपींनी त्यांना अडविले. शिवीगाळ करीत त्यांना सिमेंट गट्टू व कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याची चेन ओढून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.