Chinchwad: सिगारेट दिली नाही म्हणून तरुणाला दगडाने मारहाण

Chinchwad: Young man beaten stoned for not giving cigarettes शिरसाठ यांनी सिगोरट दिली नाही, या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी त्यांना दगडाने डोक्‍यात आणि पायावर मारहाण केली.

एमपीसी न्यूज- तोंडओळखीचे मित्र मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यांनी तरुणाला झोपेतून उठविले आणि सिगारेट मागितली. तरुणाने सिगारेट दिली नाही, म्हणून चार जणांनी एका तरुणाला दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.17) चिंचवड मधील दळवीनगर झोपडपट्टी येथे घडली.

मधुकर मोतीराम शिरसाठ (वय 36, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी बुधवारी (दि.17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विशाल ऊर्फ लंगड्या, बबलू शर्मा, सोनू शर्मा, भाव्या कांबळे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिरसाठ हे आपल्या घरी झोपले होते. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शिरसाठ यांच्या घराचा दरवाजा वाजविला.

फिर्यादी दरवाजा उघडून बाहेर आले. घराच्या बाहेर फिर्यादी यांच्या तोंडओळखीचे चार तरुण आले होते. त्यातील एकाने फिर्यादी यांच्याकडे सिगारेट मागितली.

मात्र, शिरसाठ यांनी सिगोरट दिली नाही, या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी त्यांना दगडाने डोक्‍यात आणि पायावर मारहाण केली. या घटनेत शिरसाठ हे गंभीर जखमी झाले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.