Chinchwad: पबजी खेळताना तरुणाला मारहाण

Chinchwad: Young man beaten while playing pubg game 17 जून रोजी पहाटे दोन वाजता फिर्यादी लखन आणि त्यांचे मित्र दळवीनगर, चिंचवड येथे कॅरम व पबजी गेम खेळत बसले होते.

एमपीसी न्यूज- मित्रांसोबत पबजी गेम खेळत बसलेल्या तरुणाला दोघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत धमकी दिली. ही घटना 17 जून रोजी दळवीनगर, चिंचवड येथे घडली.

लखन उर्फ बबलू अवधुक शर्मा (वय 20, रा. दळवीनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शर्मा यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मदन शिरसाठ आणि अक्षय शिरसाठ (दोघे रा. दळवीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी पहाटे दोन वाजता फिर्यादी लखन आणि त्यांचे मित्र दळवीनगर, चिंचवड येथे कॅरम व पबजी गेम खेळत बसले होते.

त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादींना शिवीगाळ केली. ‘माज उतरवतो’ अशी धमकी देत हातातील लोखंडी रॉडने लखन यांच्या पोटावर मारले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.