BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : उद्या चिंचवडला मोरया युथ फेस्टिव्हल

विश्वास नांगरे पाटील साधणार युवकांसोबत मुक्तसंवाद

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कर्तव्य फाऊंडेशनच्यावतीने मोरया युथ फेस्टिव्हल 2019 चे उदघाटन विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते चिंचवडला होणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये शनिवार दि. 12 जानेवारीला सकाळी दहा वाजता या मोरया युथ फेस्टिव्हलचे उदघाटन होणार आहे. यावेळी राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन , सिनेअभिनेते राहूल सोलापूरकर, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अमर साबळे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे,नगरसेवक बाबू नायर आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी विश्वास नांगरे पाटील हे युवकांसोबत मुक्त संवाद साधणार आहे, अशी माहिती राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष ऍंड . सचिन पटवर्धन यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A4

.