Chicnhwad youth robbed : चिंचवड येथे चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज : चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटल्याचा (Chicnhwad youth robbed) प्रकार शनिवारी (दि. 1) सकाळी रामनगर, चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी अजितकुमार रवींद्र साह (वय 28, रा. रामनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाथ कुसाळकर (वय 34, रा. रामनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandni Chowk Update: चांदणी चौकातील वाहतूक अखेर 11 तासांनी सुरळीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराशेजारी असलेल्या किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादींच्या पोटाला चाकू लावला आणि गळ्यातील 25 हजार 500 रुपयांची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. त्यावेळी जमलेले लोक आरोपीला विरोध करीत होते.(Chicnhwad youth robbed) आरोपीने नागरिकांना चाकू दाखवून मध्ये आलात तर ठार मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.