Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी 32 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (दि. 17) पिंपरी चिंचवड शहरात 32 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हा आकडा आजवरच्या दैनंदिन कारवाईमधील सर्वात कमी आहे. नियम शिथिल केल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना बाहेर पडण्यास सूट मिळाली आहे. तसेच नागरिक स्वयंशिस्तीचे पालन करत असल्याचे चित्र यामुळे दिसत आहे.

आज, सोमवार (दि. 18) पासून देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. प्रत्येक राज्यातील स्थिती पाहून काही गोष्टी सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत.

तर काही गोष्टी पुढील काळातही बंदच राहणार आहेत. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे पर्यंत असणार आहे. दरम्यान,  प्रशासनाने काही बाबतीत नागरिकांना मुभा दिली आहे. काही खासगी दुकाने, अस्थापना सुरु करण्याबाबत नियमावली देण्यात आली आहे.

रविवारी पिंपरी चिंचवड शहरात भारतीय दंड विधान कलम 188 नुसार भोसरी (1), चिंचवड (14), दिघी (5), देहूरोड (11), तळेगाव दाभाडे (1) अशा एकूण 32 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

हा आकडा आजवरच्या दैनंदिन आकडेवारीत सर्वात कमी आकडा आहे. यामुळे पुढील काळात पोलीस प्रशासनावरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.