Chinchwad: दळवीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी

दुरुस्तीचे काम सुरू

एमपीसी न्यूज – एककीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग  गेल्या सहा महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करत असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. मध्यरात्रीपासून चिंचवड, दळवीनगर येथील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, पाईपलाईन कशामुळे फुटली हे सांगता येणार नसून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे मावळातील पवना धरण यंदा 100 टक्के भरले होते. परंतु,  प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरवासीयांना हिवाळ्यापासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे.  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला आहे. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा असूनही पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी होत आहे.

मध्यरात्रीपासून चिंचवड, दळवीनगर येथील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. दळवीनगर भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पाईपलाई फुटल्याने पिण्याच्या पाण्याची अशी नासाडी झाली आहे.  हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे.  शहरात पाणी कपात सुरू असताना पालिकेचा हा निष्काळजीपणा पाहून शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जातोय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.