Chinchwad News : चिंचवडगाव येथील पीएमपीएमएल बस स्थानकात चौकशी कक्षाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – चिंचवडगाव येथील पीएमपीएल बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन केबिनचे आज (बुधवारी) उद्घाटन करण्यात आले. (Chinchwad News) पीएमपीएमएल मुख्यालय क्र.2 चे प्रमुख सुनिल दिवाण यांच्या हस्ते फीत कापून हे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार, मुकेश चुडासमा, ज्येष्ठ नागरिक संघाचे बबन चव्हाण, माळवदकर, पीएमपीएमएल चे महाव्यवस्थापकीय अध्यक्ष ओमप्रकाश बकेरीया, शिवरत्न बाणे, स्थानक प्रमुख बाळासाहेब ढोले, निवृत्त कर्मचारी चंदू वाले, प्रवासी सज्जू जगताप आदी उपस्थित होते.

New City Pride : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी

यावेळी येत्या रक्षाबंधन सणानिमित्त जास्तीत-जास्त गाड्या (Chinchwad News) सोडून प्रवाशांची सोय केली जाईल. आमच्या चालक, वाहक कर्मचार्‍यांच्या गणवेशावर प्रवाशांची निष्ठा आहे, असा विश्वास दिवाण यांनी व्यक्त केला.

तर गुलाम अली भालदार म्हणाले की, बस स्थानकावर स्त्री व पुरुषांसाठी बसस्थानकातच सुलभ शौचालयाची सोय करावी,त्यामुळे अनेकांची गैरसोय होते. तसेच, गाड्याचे वेळापत्रक ही उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.