Chinchwad crime News : काळभोरनगर येथील घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – उघड्या खिडकीवाटे प्रवेश करून चोरट्यांनी 93 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काळभोरनगर, चिंचवड येथे सोमवारी (दि. 5) पहाटे उघडकीस आली.

विष्णू गोपीरामजी चावरिया (वय 49, रा. गुप्ता हॉटेल जवळ, काळभोरनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे दीड ते चार वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी उघड्या खिडकीवाटे चावरिया यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातून आठ हजार रुपयांचा मोबाईल, 85 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण आणि इतर महत्वाची कागदपत्रे असा एकूण 93 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.