Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आणखी तीन पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; शहरातील 13 पोलीस कोरोनाबधित

Report of three more policemen from Pimpri Chinchwad Police Commissionerate is positive; 13 police coronated in the city

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आणखी तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबधित पोलिसांचा आकडा 13 झाला आहे. त्यातील आठ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला असून पाच जणांवर उपचार सुरू आहेत.

गुरुवारी सायंकाळी आलेल्या अहवालात एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात दोन पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

अहवाल आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले असून पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या 5 पोलिसांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात सलग तिसऱ्या दिवशी पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे शहर पोलीस दलात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान,  कोरोना मुक्त झाल्यानंतर घरी सोडलेले पोलीस पूर्ण उपचारानंतर कामावर रुजू देखील झाले आहेत.  तर गुरुवारपर्यंत दोघांवर उपचार सुरु होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1