Chinchwad: सामाजिक कार्यकर्ते बबन रायकर यांचं निधन

chinchwad's veteran social worker baban raikar passes away

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते बबन गणपत रायकर (74) यांचे गुरुवारी (दि.21) अल्प आजाराने निधन झाले.

रायकर यांच्यावर चिंचवड येथील मोरया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रायकर यांच्या मागे पत्नी ह.भ.प. नानी रायकर, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

बबन रायकर यांचा गांधी पेठ तालीम मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.