Chincwad : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना चिंचवड येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

गंगु सुरेश धुत्तरगी (वय 34, नागसेननगर, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गंगू या नागसेननगर परिसरातून सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 9 ग्रॅम वजनाचे 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.