Chinese Cyber Attack: चीनमधून सायबर हल्ले वाढले, पाच दिवसांत 40 हजारहून अधिक प्रकरणे समोर

Chinese Cyber ​​Attack: Cyber ​​attacks from China increase, with more than 40,000 cases in five days बहुतांश हल्ले हे चीनमधील चेंगडू परिसरातून झाले आहेत.

एमपीसी न्यूज- चीनच्या हॅकर्सनी माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग सेक्टरवर मागील 5 दिवसांत महाराष्ट्रात 40 हजारहून अधिक सायबर हल्ले केले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. राज्य पोलीस दलाची सायबर शाखा ‘महाराष्ट्र सायबर’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंटरनेटचा उपयोग करणाऱ्या लोकांनी अशा प्रकारच्या हल्ल्यापासून सावध राहिले पाहिजे. आपल्या आयटी सिस्टिमचे सायबर सुरक्षा ऑडिट केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

सायबर शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव म्हणाले की, पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमधील तणावानंतर ऑनलाइन हल्ले वाढले आहेत. महाराष्ट्र सायबरने या प्रयत्नांची माहिती एकत्र केली आहे. यामध्ये बहुतांश हल्ले हे चीनमधील चेंगडू परिसरातून झाले आहेत.

ते म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार-पाच दिवसांत भारतीय सायबर स्पेसच्या संसाधनांवर सायबर हल्ल्याचे किमान 40300 प्रयत्न झाले.


हल्ल्याचा उद्देश हा सेवा देण्यास मनाई, इंटरनेट प्रोटोकॉल हायजॅक करणे आणि जाळ्यात अडकवणे आदींचा समावेश आहे. भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांनी अशा प्रकारच्या हल्ल्यांकडे लक्ष दिले पाहिजे. सुरक्षित फायरवॉल बनवले पाहिजे आणि सायबर सुरक्षा ऑडिट केले पाहिजे.

महाराष्ट्रातील सायबर अधिकाऱ्यांच्या मते, या हॅकर्सकडे सुमारे 20 लाख भारतीय ई-मेल आयडी असण्याचा संशय आहे.

जेथे बनावट ई-मेल किंवा संदेश पाठवून गोपनीय पासवर्ड किंवा पास कोड मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तिथे भारत सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर खासगी इंटरनेट वापरकर्त्यांनीही अशा प्रकारच्या हल्ल्यापासून संरक्षण केले पाहिजे.

अशा प्रकारचा एक बनावट ई-मेल ‘एनकोव2019एटगोवडॉटइन’ आढळून आला आहे. जो दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद येथील लोकांना निःशूल्क कोविड-१९ तपासणीसाठी बनावट माहितीच्या रुपात पाठवले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like