BCCI On Chinese Sponsorship in IPL : क्रिकेट आणि देशाचे हित लक्षात घेऊनच चायनिज स्पॉन्सरशिप बाबत निर्णय घेतला जाईल – बीसीसीआय 

Chinese sponsorship will be decided in the interest of cricket and the country - BCCI आयपीएल स्पॉन्सर करणाऱ्या 'विवो' या चायनिज मोबाईल कंपनीवर देखील बंदी घालावी व बीसीसीआय'ने आयपीएल साठी त्यांची स्पॉन्सरशिप घेऊ नये अशी मागणी होत आहे.

एमपीसी न्यूज – आयपीएल या बहुप्रतीक्षित क्रिकेट स्पर्धेच्या चायनिज स्पॉन्सरशिप वरून चांगलाच वादंग पेटला आहे. मात्र, बीसीसीआय’ने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून क्रिकेट आणि देशाचे हित लक्षात घेऊनच चायनिज स्पॉन्सरशिप बाबत उचित निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. 

चीन आणि भारतीय सैनिकाच्या लडाख येथे झालेल्या चकमकीत वीस भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशातून चीन विरोधी सूर उठू लागला आहे. त्यामुळे चिनी मोबाइल अप्लिकेशन पासून ते चिनी बनावटीच्या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी जोर धुरू लागली होती. त्याचाच भाग म्हणून भारताने टिक टॉक, युसी ब्राउझर, या सहित 59 चिनी मोबाईल अप्लिकेशन वर बंदी घातली आहे.

आयपीएल स्पॉन्सर करणाऱ्या ‘विवो’ या चायनिज मोबाईल कंपनीवर देखील बंदी घालावी व बीसीसीआय’ने आयपीएल साठी त्यांची स्पॉन्सरशिप घेऊ नये अशी मागणी होत आहे. त्यामुळे बीसीसीआय’ने याबाबत स्पष्टीकरण देत क्रिकेट आणि देशाचे हित लक्षात घेऊनच चायनिज स्पॉन्सरशिप बाबत निर्णय घेतला जाईल असे त्यानी सांगितले आहे.

तसेच, आयपीएल आढावा बैठकीसाठी आत्तापर्यंत कोणतीही तारीख ठरविण्यात आलेली नाही व बीसीसीआय इतर बाबींचा देखील विचार करत असल्याचे एका अधिकार्यांने ANI या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. दोन्ही देशांच्या सैनिकात गलवान घाटीत झालेल्या चकमकीवरून उभय देशातील तणाव वाढला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.