Chinhcwad: लक्ष्मण जगताप यांना दीड लाख, राहुल कलाटे यांना एक लाख 12 हजार तर, ‘नोटा’ला तिस-या क्रमांकाची 5868 मते

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना एक लाख 50 हजार 723 मते मिळाली. तर, अपक्ष राहुल कलाटे यांना एक लाख 12 हजार 225 मते मिळाली. जगताप यांचा 38 हजार 498 मतांनी विजय झाला. तर, चिंचवड मतदारसंघात ‘नोटा’ म्हणजेच ‘वरीलपैकी एकही नाही’ला तिस-या क्रमाकांची 5 हजार 868 मते मिळाली आहेत.

चिंचवडमध्ये दोन लाख 76 हजार 927 पुरुष आणि दोन लाख 41 हजार 980 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 18 हजार 309 मतदार आहेत. त्यापैकी एक लाख 54 हजार 550 पुरुष आणि एक लाख 23 हजार 198 महिला आणि इतर एक अशा दोन लाख 77 हजार 750 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. 53.59 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

भाजपचे लक्ष्मण जगताप यांना एक लाख 50 हजार 488 आणि पोस्टल 235 अशी एक लाख 50 हजार 723 मते मिळाली. 38 हजार 498 मतांनी ते विजयी झाले आहेत. तर, अपक्ष राहुल कलाटे यांना एक लाख 11 हजार 994 आणि पोस्टल 231 अशी एक लाख 12 हजार 225 दुस-या क्रमांकाची मते मिळाली आहेत. तर, नोटाला म्हणजेच वरीलपैकी एकही नाही तिस-या क्रमाकांची 5 हजार 868 मते मिळाली आहेत.

चिंचवड मतदारसंघातील उमेदवार आणि मिळालेली मते :
भाजपचे लक्ष्मण जगताप – एक लाख 50 हजार 723
अपक्ष राहुल कलाटे – एक लाख 12 हजार 225
बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे – 3 हजार 950
बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप – 569
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती देसले – 567
जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे – 723
भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती – 903
अपक्ष डॉ. मिलिंदराजे भोसले – 498
रवींद्र विनायक पारधे – 1474
राजेंद्र काटे – 332
सुरज खंडारे – 384
‘नोटा’ (वरीलपैकी एकही नाही) – 5868.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.