Pimpri-Chinchwad : चिन्मय मिशन आयोजित भगवद्‌गीता पाठांतर स्पर्धेचा बाक्षिस समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज :  चिन्मय मिशन पिंपरी-चिंचवड़ शाखेच्या वतीने भगवद्‌गीता पाठांतर स्पर्धेचा बाक्षिस समारंभ सोहळा आज 4 डिसेंबरला संपन्न झाला.(Pimpri-Chinchwad) या स्पर्धेमध्ये पिपरी-चिचवड मधील 2265 मुलांनी सहभाग घेतला. गीता जयंतीचे औचित्य साधून ज्ञान प्रबोधिनी पिंपरी-चिंचवड येथे अंतीम फेरी घेण्यात आली. अंतीम फेरी मध्ये विविध पाच गटांमध्ये मिळून 30 विद्यार्थ्यांना निवडण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ब्रम्हचारीणी मैत्रीयी चैतन्यजी उपस्थित होत्या. त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना ” कृष्णाला आपला बेस्ट फ्रेड बनवा ” असे संगितले. मुलांनी गीतेचा अभ्यास करावा असे सर्व पालकांना वाटते पण उत्तम पाल्य घडवण्यासाठी पालकांनी गीतेचा अभ्यास करणे तितकेच महत्वाचे आणि जरूरीचे असल्याची भावना मैत्रेयीजींनी व्यक्त केली.

आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत ही आपल्यावर भगवंताची मोठी कृपा आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि आपण आपला स्वतःचा उद्धार करून घेवू शकतो त्यासाठी त्यांनी गीते मधील या श्लोकाचे अच्चारण केले “उद्धरेत् आत्मना आत्मानम् न आत्मानम् अवसादयेत् “.(Pimpri-Chinchwad) तसेच प्रमुख पहुणे हीमांशू नंदा यांनी गोष्टी रूपातून सांगितले की, हिंदू संस्कृती ही मुळातच द्यायला शिकवणारी संस्कृती आहे. गीता पठणाचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहभागी शाळेतील शिक्षकांचे व पालकांचे विशेष योगदान लाभले असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

PCMC News : पालिका शाळांमध्ये ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रमांतर्गत स्पर्धा अन् ‘या’ विद्यार्थ्यांना ‘भारतदर्शन सफर’

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुद्र आठवले , राधव इनामदार , आर्या कुलकर्णी , सोहम पडवेकर, अदिती देशपांडे ,अवनी चौधरी यांना मिळाला. महत्वाची बाब म्हणजे सहा वर्षाची डिफरंटली एबल म्हणजे विशेष सक्षम विद्यार्थीनी नीरजा घोडके हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले-(Pimpri-Chinchwad) पुढील वर्षी गीते मधील 4 था अध्याय पाठांतरासाठी असणार आहे असे चिन्मय मिशन पिंपरी-चिंचवड तर्फे सांगण्यात आले . गटांमध्ये मिळून 30 विद्यार्थ्यांना निवडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.