Talgaon Dabhade : पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चिन्मयी लिमये शहरी भागातून प्रथम

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थीनी चिन्मयी लिमये हि शहरी भागातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. 

आदर्श विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांनी  याबाबत माहित दिली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णकांत वाढोकर, सचिव  यादवेंद्र खळदे, प्रा.वसंत पवार, मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांनी  विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.