Senior citizen fraud : ज्येष्ठ नागरिकाची चिटफंड कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने 80 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : चिटफंड कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला डिव्हीडंट देतो, असे अमिश दाखवून 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून 80 लाख 70 हजार 647 रुपयांच्या ठेवी घेत फसवणूक केली.(Senior citizen fraud)हा प्रकार फेब्रुवारी 2019 ते 1 ऑक्टोबर 2022 या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडला.

कडवील मॅथ्यू बाबू (वय 75, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेकब जॉर्ज (वय 58, रा. बोपोडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tata Motor’s : टाटा मोटर्सच्या Q2FY23 गाड्यांच्या विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी आणि इतर सभासदांना त्याच्या चिटफंड कंपनीत गुंतवणूक करा चांगला डिव्हीडंट देतो, असे आमिष दाखवले.(Senior citizen fraud) आरोपीकडे नागरिकांनी 80 लाख 70 हजार 647 रुपये ठेव ठेवली. या ठेवी आरोपीने परत न देता पैशांचा अपहार करून फसवणूक केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.