BNR-HDR-TOP-Mobile

Pune : चोक्सी, सिंहगड स्कूल, डॉन बॉस्को संघाचे विजय

82
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – एस. एम. चोक्सी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आरएमडी सिंहगड स्कूल ऑफ इंजिनीअरिंग आणि डॉन बॉस्को सिनीयर कॉलेज या संघांनी रिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्ट्स फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला.

डोबरवाडी येथील पीडीएफए ग्राउंडवर सुरू असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ मुलांच्या गटातील पहिल्या फेरीतील लढतीत चोक्सी हायस्कूलने त्रिनीती कॉलेज ऑफ कॉमर्स संघावर टायब्रेकमध्ये ४-१ने मात केली. निर्धारित वेळेत ही लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. यात चोक्सी कॉलेजकडून यश खांतेरने (३७ मि.), तर त्रिनीती कॉलेजकडून प्रवीण गायकवाडने (३८ मि.) गोल केला. टायब्रेकमध्ये चोक्सी हायस्कूलकडून हर्ष शहा, युगल खांतेर, यश खांतेर, फरहान शेख यांनी गोल केले. त्रिनीत कॉलेजकडून केवळ उसायद शेखलाच गोल करता आला.

इतर लढतींत कॉलेज बॉइज गटातील पहिल्या फेरीत आरएमडी सिंहगड स्कूल ऑफ इंजिनीअरिंग संघाने आयएमईडी संघावर टायब्रेकमध्ये ४-२ने मात केली. यानंतर डॉन बॉस्को सिनीयर कॉलेज संघाने जी. एच. राईसोनी एज्युकेशन मेडिकल फाउंडेशन, वाघोली संघावर टायब्रेकमध्ये ४-३ने विजय मिळवला.

निकाल – पीडीएफए मैदान –

ज्युनियर मुले– पहिली फेरी – द ऑरबिस स्कूल – ३ (अरिंजय नायर १७ मि., धीर जोहरी २७ मि., अक्षित क्षीरसागर ५० मि.) वि. वि. आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज – ०.

सीनियर मुले – पहिली फेरी – एसएम चोक्सी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज – १ (४) (यश खांतेर ३७ मि., हर्ष शहा, युगल खांतेर, यश खांतेर, फरहान शेख) वि. वि. त्रिनीती कॉलेज ऑफ कॉमर्स – १ (१) (प्रवीण गायकवाड ३८ मि., उसायद शेख).

कॉलेज मुले – पहिली फेरी – १) आरएमडी सिंहगड स्कूल ऑफ इंजिनीअरिंग – ० (४) (तेजस पवार, सिद्धान्त त्यागी, अथर्व लाड, ह्रतिक हरिभक्त) वि. वि. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एन्टरप्रेनूयरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) – ० (२) (प्रतीक दिनद्याळ, अशोक बोहरा).

२) डॉन बॉस्को सिनीयर कॉलेज – २ (४) (शुभम पवार ३५ मि., विनीत फ्रान्सिस ४० मि., व्हिन्सेंट फ्रान्सिस, रोनीत चौरे, तुषार साळुंके, संदीप बांगड) वि. वि. जी. एच. राईसोनी एज्युकेशन मेडिकल फाउंडेशन, वाघोली – २ (३) (निशाद गोंडे ३५ मि., शिशिर टोप्पो ५४ मि., निशाद गोंडे, मनजित जिनज्योत, शिशिर).

३) पीव्हीजी कॉलेज इंजिनीअरिंग – ३ (सोहम बांड २ मि., गंधर्व जाधव १६ मि., महंमद फैसल ५८ मि.) वि. वि. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स – ०.

हेडगेवार ग्राउंड, पीसीएमसी – वरिष्ठ मुले, लीग – ग्रुप एच – आदित्य ज्युनियर कॉलेज – २ (भुषण चौधरी २ मि., तन्मय कोळी २३ मि.) बरोबरी वि. एसएनबीपी स्कूल, मोरवाडी – २ (सुमेग गायकवाड ५ मि., अनिरुद्ध तानपुरे २८ मि.).

ज्युनियर मुले- दुसरी फेरी – न्यू मिलेनियम हायस्कूल – ५ (अनिकेत गोरे २ मि., साई भांडवलकर १७ मि., सार्थक कुरुमकर १८, ३९, ४६ मि.) वि. वि. रॉयल वर्ल्ड स्कूल – २ (राहुल पाटील १२ मि., पियूष मखिजा १५ मि.).

ब्लू रिद्ज पब्लिक स्कूल – २ (शिरीष भुजबळ २७ मि., वरुण भिलारे ४० मि.) वि. वि. जयहिंद हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज – ०.

ज्युनियर मुले – पहिली फेरी – माउंट सेंट अना हायस्कूल – ६ (मीत मधोरिया २ मि., वेदांत कुलकर्णी १५, २९ मि., यश गरुड २७, ३५ मि., अनिकेत शेटे ४० मि.) वि. वि. सरस्वती भवन इंग्लिश मीडियम स्कूल – ०.

कै. अनंतराव पवार स्मृती स्कूल – २ (प्रणव दिघे ४६ मि., स्वयंम जाधव ४८ मि.) वि. वि. एस. बी. पाटील हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज – ०.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.