Dighi : तीन सराईत चोरटे गजाआड; दिघी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – घरफोडी करणा-या तीन सराईत चोरट्यांना दिघी पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

रमेश भुकल साह (वय 25, रा. गव्हाणे वस्ती भोसरी. मूळ रा. नबीगंज, पो. मिरगंज, जि. सिहान, बिहार), संजय बिहारी चौहान (वय 27, रा. भोसरी गावठाण. मूळ रा. बलीपूर, पो. गोपीगंज, जि. बदोही, उत्तरप्रदेश), संदीपसिंग बंगालीसिंग चौहान (वय 23, रा. भोसरी फिरस्ता. मूळ रा. मालखापूर, सराईनात, इलाहाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती उत्सवात गस्त घालत असताना पोलीस नाईक हेमंत आव्हाड यांना माहिती मिळाली की, दिघी जकात नाका येथे तीनजण संशयितरित्या थांबले आहेत. त्यांच्याकडे चोरीचा टीव्ही आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली.

जानेवारी महिन्यात च-होली फाटा येथील दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून त्यातून दुकानातील टीव्ही, मोबाईल फोन, हेडफोन असा ऐवज चोरून नेला. ऑगस्ट महिन्यात गंधर्व पार्क, काळजेवाडी येथील साईट ऑफिसमधील फर्निचर चोरून नेले. या दोन्ही गुन्ह्याची आरोपींनी कबुली दिली. त्यांच्याकडून चार टीव्ही, तीन मोबाईल फोन, दोन लाकडी टेबल, दोन खुर्च्या असा एकूण 90 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.