Pune : ‘नृत्ययात्री’ संस्थेतर्फे 22 नोव्हेंबरला ‘चुडामणी प्रदानम’ पौराणिक नृत्यनाटिका

एमपीसी न्यूज – ‘नृत्ययात्री ‘ संस्थेतर्फे ‘चुडामणी प्रदानम ‘ पौराणिक नृत्यनाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ नोव्हेंबरला रामायणातील प्रसंग नृत्यातून सायंकाळी पावणे सात वाजता रंगणार आहे. चेन्नईच्या ‘कलाक्षेत्र फौंडेशन’च्या सहकार्याने ४ वर्षांनी ही नृत्यनाटिका पुणेकर रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘कलाक्षेत्र फौंडेशन’ ही गुरु रुक्मिणीदेवी यांनी १९३६ मध्ये स्थापन केलेली संस्था आहे.

_MPC_DIR_MPU_II

‘नृत्ययात्री ‘ संस्थेच्या प्रमुख मेघना साबडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या नृत्यनाटिकेत चेन्नईचे ४० कलाकार सहभागी होणार आहेत. ‘कलाक्षेत्र’ संस्थेच्या दिग्दर्शक रेवथी रामचंद्रन तसेच पुण्याच्या सांस्कृतिक विश्वातील अनेक मान्यवर रामायणावर आधारित या पौराणिक नृत्य नाटिकेचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

अशोक वाटिकेत कैद सीतेला भेटून धीर देऊन रामाला क्षेम कुशल सांगण्यासाठी हनुमान परत निघाले तेव्हा चुडामणी  हे रत्न सीतामाई हनुमानाजवळ खूण म्हणून देते. सुग्रीवासह राम लंकेस सीतामाईच्या सोडवणुकीसाठी येतील, असे सांगून हनुमान लंकेतून निघतात. जटायू वधापासूनचे रामायणातील अनेक प्रसंग या नृत्य नाटिकेत अनुभवायला मिळणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.