CICSE : सीआयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) दहावी आणि बारावीच्या (CICSE )  परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा 12 फेब्रुवारी ते 3 मार्च, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत होणार आहे. 2024 च्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची नवी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कम्पार्टमेंट परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra : दहावी, बारावी परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ, 20 डिसेंबर पर्यंत भरता येणार ऑनलाईन अर्ज


सीआयसीएसईने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या परीक्षेत कला विषयाची परीक्षा वगळता अन्य विषयांच्या परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहेत. कला विषयाची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत घेतली जाणार आहे. तर बारावीच्या सर्व विषयांची परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकासह परीक्षेबाबत च्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परीक्षेचे दिनांक निहाय वेळापत्रक cisce.org या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.

सीआयसीएसईने 2024 च्या परीक्षेपासून कम्पार्टमेंट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याच्या प्रचलित सुविधेसह पुनर्मूल्यांकन करण्याची नवी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दोन विषयांसाठी इम्प्रुव्हमेंट परीक्षा देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले (CICSE ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.