Corona Vaccine News : दुसरा डोस घेण्यास नागरिक उदासीन; पावणेदोन लाख जणांनी घेतला नाही डोस  

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरा डोस घेण्याबाबत नागरिक उदासीन असल्याचे दिसून येते. शहरातील 18 लाख 37 हजार 107 जणांनी पहिला तर 16 लाख 65 हजार 522 जणांनी दुसरा डोस घेतला. तर, 1 लाख 71 हजार 585 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही.  

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांना वैद्यकीय विभागाने लसीकरणाची लेखी माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 61 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले. शहरातील 18 लाख 37 हजार 107 नागरिकांना पहिला, 16 लाख 65 हजार 522 नागरिकांची लसीचा दुसराही डोस घेतला आहे. तर, 69 हजार 773 नागरिकांनी प्रिकॉशन डोस देखील घेतला. असे एकूण शहरातील 35 लाख 72 हजार 402 नागरिकांनी 1 मे 2022 पर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

नाईक यांनी कोरोना काळात महापालिकेने किती केंद्रे स्थापन केली होती. त्याची माहिती मागविली. महापालिकेने 61 लसीकरण केंद्र स्थापन केल्याची माहिती दिली. कोरोना हद्दपार झाला नाही. मग ही लसीकरण केंद्र चालू आहेत की बंद आहेत. याचीही माहिती मागविली होती. सद्यस्थितीत 19 लसीकरण केंद्र चालू असल्याची माहिती महापालिकेने दिली.

एचसीडब्ल्यू गटातील 32 हजार 621 जणांनी पहिला तर 29 हजार 389 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. या गटातील 62 हजार 10 जणांनी लस घेतली. फ्रंट लाईन वर्कर (एफएलडब्ल्यू) 47 हजार 67 जणांनी पहिला तर 44 हजार 257 जणांनी दुसराही डोस घेतला असून एकूण 91 हजार 324 जणांनी लस घेतली. या दोनही गटातील 16 हजार 484 जणांनी प्रिकॉश डोसही घेतला आहे.

पावणेदोन लाख जणांनी घेतला नाही दुसरा डोस  

18 ते 44 वयोगटातील 11 लाख 85 हजार 271 जणांनी पहिला तर 11 लाख 4 हजार 859 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण 22 लाख 90 हजार 130 जणांनी लस घेतली. तर, 1 हजार 486 जणांनी प्रिकॉशन डोस घेतला. 45 ते 59 या वयोगटातील 3 लाख 33 हजार 25 जणांनी पहिला तर 2 लाख 72 हजार 956 जणांनी दुसराही डोस घेतला. या वयोगटातील 5 लाख 76 हजार 281 जणांनी लस घेतली. 2 हजार 724 जणांनी  प्रिकॉशन डोसही घेतला. 60 वर्षापुढील 1 लाख 75 हजार 957 जणांनी पहिला तर 1 लाख 63 हजार 962 जणांनी दुसरा डोस घेतला. एकूण 3 लाख 39 हजार 919 जणांनी डोस घेतला. तर, 49 हजार 79 जणांनी  प्रिकॉशन डोसही घेतला आहे.

15 ते 18 वयोगातील 69 हजार 922 जणांनी पहिला तर 46 हजार 896 जणांनी दुसरा डोस घेतला असून एकूण 1 लाख 16 हजार 818 जणांनी डोस घेतला. 12 ते 14 वयोगटातील 22 हजार 944 मुलांनी पहिला तर 3 हजार 203 जणांनी दुसराही डोस घेतला आहे. या वयोगटातील 26 हजार 147 जणांनी लसीकरण करुन घेतले. एकूण 18 लाख 37 हजार 107 जणांनी पहिला तर 16 लाख 65 हजार 522 जणांनी दुसरा डोस घेतला. 35 लाख 72 हजार 402 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.