Pimpri News: शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना बुधवारी ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार

Citizens between the ages of 18 and 45 in the city will receive the Covishield vaccine on Wednesday.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (बुधवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार पहिला, दुसरा डोस!

हेडगेवार जलतरण तलाव, प्रेमलोक पार्क दवाखाना,महापालिका शाळा खराळवाडी, क्वालिटी सर्कल भोसरी, पिंपळेनिलख इंगोले शाळा, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, नवीन भोसरी रुग्णालय,महापालिका शाळा बोपखेल,सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सखुबाई गार्डन भोसरी, मोशी दवाखाना, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, गंगोत्री पार्क दिघी,कन्या शाळा चिखली, घरकुल दवाखाना चिखली, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती,नूतन शाळा ताम्हाणे वस्ती,यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, महापालिका शाळा रहाटणी, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी आणि अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी या 21 केंद्रांवर कोविन ॲपवरुन बुकिंग केलेल्या आणि किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या लाभार्थ्यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोविन ॲपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत.

या ‘आठ’ ठिकाणी ऑनदस्पॉट ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार!

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या आठ ठिकाणी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पध्दतीने 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर लस मिळणार!

ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर,
महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा किवळे,बिलजीनगर दवाखाना, बापुराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, सेकटर 29 रावेत, महापालिका शाळा जाधववाडी,महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, नेहरुनगर उर्दु शाळा,संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर,पिंपळेगुरव माध्यमिक शाळा,महापालिका शाळा वाकड, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर,
छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, ठाकरे शाळा रूपीनगर,स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, तळवडे समाज मंदिर शाळा, भानसे स्कुल यमुनानगर, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग आणि कासारवाडी दवाखाना या 21 केंद्रांवर कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

तर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर आणि मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, येथे 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 50 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस!

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.