Bhosari News : पाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांना मिळाले त्यांचे चोरीला गेलेले मोबाईल

एमपीसी न्यूज पाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांना (Bhosari News) त्यांचे चोरीला गेलेले 17 मोबाईल पोलिसांनी परत केले . भोसरी पोलिसांनी मंगळवारी (दि.21)  दोन लाख 20 हजार रुपयांचे महागडे मोबाईल परत केले.

 

भोसरी पोलीस ठाणे हद्दीत चोरीला गेलेले 17 महागडे फोन पोलिसांनी तपासात शोधून काढून ते फोन मालकांच्या स्वाधीन केले.गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी फोन परत मिळाल्याने नागरिक आनंदी होते.

 

यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक विवेक पाटील यांच्या उपस्थित फोनचे वाटप करण्यात आले.

 

Women Maharashtra Kesari : सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा!

 

हि कामगिरी भोसरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सागर जाधव यांनी माबाईलचे तांत्रिंक विश्लेषण केले.(Bhosari New) त्याद्वारे सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, मुकेश मोहारे, सहायक फोजादार राकेश खाडे, संतोष महाडिक, तुषार वराडे, सचिन सातपुते, स्वामी नरवडे, प्रतिभा मुळे यांनी केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.