Vadgaon Maval : मावळ तालुक्यातील नागरिक टोलमुक्त !

एमपीसी न्यूज : जोपर्यंत टोलनाका हटवला जात नाही तोपर्यंत मावळ वासीयांना टोलमध्ये सूट दिल्याचे आश्वासन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुरुवारी (दि.18) रोजी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत एमएसआरडीसीए व आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोमाटणे व वरसोली टोल नाक्यावर मावळ वासीयांना टोल मध्ये सूट भेटल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. टोल नाका संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, एमएसआरडीसीए अधिकारी दिलीप शंकरवार, आयआरबी अधिकारी हेमंत रासवडकर, वामन राठोड, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगरसेवक किशोर भेगडे, गणेश काकडे, गणेश खांडगे, अमोल शेटे, अरुण भेगडे, निखिल भगत, शोभा भेगडे, सचिन भांडवलकर, मिलिंद अच्युत, विश्वनाथ शेलार, कल्पेश भगत, महादेव तुपारे, मुन्ना मोरे, आशिष खांडगे, पोलीस कर्मचारी प्रशांत वाबळे, बाबाराजे मुंडे, भगवान थिटे  व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

मावळ तालुक्यात 15 वर्षांपासून बेकायदा टोल वसुली केली जात असून मावळच्या जनतेची आर्थिक लूट केली आहे. मावळ तालुक्यात सोमाटणे, तळेगाव दाभाडे वडगाव मावळ आदी ठिकाणी कामानिमित्त व नोकरीसाठी ये जा करताना टोल द्यावा लागतो. या टोल देण्यावरुन वारंवार तक्रारीतुन वादाच्या घटना घडल्या आहेत. मावळच्या जनतेसाठी 300 रुपये मासिक पास सुरु करुन लूट करत आहे. मात्र आता मावळात सोमाटणे व वरसोली टोल नाक्यावर मावळातील नागरिकांना टोल वसूल मधून सूट दिली आहे. असे नगरसेवक किशोर भेगडे यांनी सांगितले.

मावळातील नागरिकांना टोल वसूल सूट व टोल हटाव याबाबत वरीष्ठ स्थरावर निर्णय होत नाही तोपर्यंत टोल मध्ये सूट देण्यात येणार आहे. सर्वपक्षीय केलेल्या मागणीचे पत्र मंत्रालयात पाठवून निर्णय झाल्याची त्वरीत माहिती देण्यात येणार असल्याचेएमएसआरडीसीए अधिकारी दिलीप शंकरवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोनाच्या नवा स्ट्रेन येणार असल्याने रविवारी (दि.21) रोजीचे आंदोलन रद्द करावे. तसेच टोलबाबत आपल्या मागण्या वरिष्ठ कार्यालयात पाठवून देण्यात येईल. मावळ वासीयांना निर्णय होईपर्यंत टोलमध्ये सूट देण्यात आल्याचे जाहीर केले असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी सांगितले.

मावळातील एम एच 14 व एम एच 12 गाड्यांना या टोल नाक्यावर सूट द्यावी. टोलनाका बंद होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे नगरसेवक गणेश खांडगे यांनी सांगितले. या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.