Pune news: शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांना झोपडपट्ट्या सोडण्यास तीन दिवसांची मुदतवाढ

Citizens of Rajiv Gandhinagar and Kamgar Putla slums in Shivajinagar have been given three days extension to leave the slums.

0

एमपीसी न्यूज- पुणे मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांचे हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पामध्ये  4 जून पासून  पुनर्वसन प्रक्रीया सुरू करण्यात येत आहे.  दिलेल्या मुदतीत जवळपास ३०० जणांनी आपले घर सोडलेले नाही. शिवाय नोंदणी प्रक्रीयेत सहभाग घेतलेला नाही. या लोकांना आणखी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

पुनर्वसन करण्यात आलेल्या झोपडपट्टी धारकांच्या नवीन सदनिकांच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आली. या दोन्ही झोपडपट्ट्यांमध्ये मिळून जवळपास 1 हजार 500 झोपडीधारक आहेत. २८ मे पर्यंत १५५ सदनिकांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. या नागरिकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया २४ मे पासून सुरू झाली. ही प्रक्रिया ८ जूनपर्यंत सुरु राहणार होती. या मुदतीत सदनिका न स्विकारणा-यांचा हक्क संपुष्टात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

तरीदेखील तब्बल 300 झोपडीधारक या नोंदणी प्रक्रियेला अनुपस्थित राहिले. या सर्वांची नोंदणी करण्यासाठी आणखी तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील तीन दिवस दुय्यम नोंदणी कार्यालये दुपारी तीनपर्यंत सुरु ठेवली जाणार आहेत. त्यानंतर मात्र कारवाई केली जाणार आहे.

पुनर्वसन झालेल्या झोपडीधारकाने त्याची सध्याची झोपडी रिकामी करून सर्व घरगुती साहित्य सोबत न्यावे आणि सदनिकेचा ताबा घ्यावा. त्याकरिता चार हजार रुपये खर्च दिला जाणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. या झोपडपट्ट्यांमध्ये 50 दुकानदार होते. या दुकानदारांनी सदनिकांचा स्विकार केल्यानंतर त्यांच्या दुकानांविषयी विचार करु असे निंबाळकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment