Vadgaon Maval : आयआरबी कडून टाकण्यात येणाऱ्या दुभाजकांना नागरिकांचा विरोध

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायत हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील मातोश्री हॉस्पिटल चौक, न्यू इंग्लिश स्कुल, दिग्विजय कॉलनी व माळीनगर आदी ठिकाणी आयआरबी कडून मार्ग दुभाजक टाकून बंद करण्यात आले आहे.  याला नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या सह नागरिकांनी  विरोध दर्शवला आहे.

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील दक्षिण भागातील नागरिकांच्या येण्याची जाण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मातोश्री हॉस्पिटल चौक, न्यू इंग्लिश स्कुल, दिग्विजय कॉलनी माळी नगर आदी ठिकाणी मार्ग आहे. या मार्गावरून दैनंदिन १५,००० नागरिकांची वर्दळ असते.  त्यातच विद्यार्थी, महिला, कामगार, दुग्धव्यवसायिक व जेष्ठ नागरिक यांचे अनेक वेळा अपघात झाले आहे.

 न्यू इंग्लिश स्कुलच्या हजारो विद्यार्थ्यांसाठी भुयारी मार्ग केला असून त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने मद्यपी व चोरट्यांचा अड्डा बनला आहे. त्याच ठिकाणी मुली व महिलांची छेडछाड केल्याच्या घटना घडत आहे. त्यातच महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम रखडले असून नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध ना केल्यामुळे नागरिकांना एक किलोमीटर चा वळसा घेऊन ये जा करावी लागणार आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. आयआरबी कडून टोल वसूल केला जात असुन महामार्गाच्या सुरक्षित्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाच्या ठिकाणी पर्यायी मार्ग करण्याची मागणी करण्यात येत आहे. या महामार्गावर वाहनांची गती तीव्र असते अनेकांचा बळी या ठिकाणी गेला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावतीने या मार्गातील रस्तेमध्ये दुभाजक टाकून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत पर्यायी मार्गाची व्यवस्था केली जात नाही तोपर्यंत दुभाजक टाकण्यास नगरपंचायत कडून विरोध कायम राहणार असल्याचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, बंडोबा भेगडे, सोमनाथ भोसले, संतोष भोसले, विठ्ठल भोसले, खंडू भिलारे आदींनी महामार्गावर याठिकाणी दुभाजक टाकण्यासाठी विरोध केला.

 ढोरे  म्हणाले पर्यायी मार्ग उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत विरोध कायम राहणार. आयआरबी ने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. ” “महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अभियंता राकेश सोनवणे म्हणाले देहूरोड ते लोणावळा मार्गातील  ब्लॅक स्पॉट अपघात क्षेत्र  याठिकाणी असलेले मार्ग दुभाजक टाकून बंद करणार आहे. ज्या ठिकाणी विरोध होत आहे त्याठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यासाठी सर्वेक्षण लवकरच सुरु करणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.